prabodhini news logo
Home अमरावती जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न

जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न

0
123

अमरावती, दि. 19 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आज पार पडला. श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह, जिल्हा क्रीडा संकुल आणि श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. श्री. शशिकांत देशमुख, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, संजय कथलकर, माजी तालुका क्रीडा अधिकारी अशोक महल्ले, भारत मुंडे, शिशिर मेश्राम आदी उपस्थित होते.
जिल्हा युवा महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम – प्रतीक्षा शिंदे, द्वितीय – सौरभ गुडधे, तृतीय – कृष्णानेश यादव. काव्यलेखनमध्ये प्रथम – कोमल बोरीवार, द्वितीय – व्यंकटेश नेरकर , तृतीय – भूमिका काठे. चित्रकलेत प्रथम – खुशी उपरीकर, द्वितीय – मुकेश अढाऊ, तृतीय – अखिल डोंगरे, कथालेखनात प्रथम – व्यंकटेश नेरकर, द्वितीय – मानसी डोंगरे, तृतीय – रायबा ठाकरे, लोकगीतात प्रथम – श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती, द्वितीय – एडीफाय इंग्लिश स्कुल, अमरावती, तृतीय – सुरसंगम कला वाद्य अकादमी प्रबोधिनी, अमरावती, लोकनृत्यात प्रथम – ऐडीफाय इंग्लिश स्कूल, अमरावती, नवोपक्रम ट्रॅक (विज्ञान प्रदर्शन): प्रथम – ऐश्वर्या तारवानी , द्वितीय – अवेस खाँ युनुस खाँ, तृतीय – सुमित जाखड, रेहॉन खान हे विभागस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
क्रमांक पटकाविलेल्यांना उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी श्री. भटकर यांनी, सांस्कृतिक कार्यक्रम हे परंपरा, संस्कृती, सामाजिक जीवनमूल्ये यांचे आदानप्रदान करण्यास सहाय्यक आहेत. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याचे हे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
श्री. जाधव यांनी प्रास्ताविकातून युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळते. त्यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी ‘विकसित भारत चॅलेंज ट्रॅक’ करिता माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. शिशिर मेश्राम यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संजय कथलकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here