prabodhini news logo
Home ठळक बातम्या MSEB 33 KV लाईनमधील नुकसानभरपाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार

MSEB 33 KV लाईनमधील नुकसानभरपाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार

0
98

बाणेगाव स्मशानभूमीला कायमस्वरूपी तोडगा देण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक — खासदार प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे यांचा बाणेगाव गाव भेट दौरा

सोलापूर – दि. १९ नोव्हेंबर २०२५ सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील विविध प्रश्नांची माहिती जाणून घेत, त्यावर वेळेत उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.
ग्रामस्थांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,
MSEB च्या 33 KV लाईनमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे.
बाणेगाव स्मशानभूमीच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात येणार असून हा दीर्घकालीन प्रश्न निकाली काढला जाईल.
माळढोक अभयारण्य परिसरातील रानडुक्कर व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारा त्रास कायमस्वरूपी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणार आहेत.
बाणेगाव व परिसरातील रस्ते सुधारणा, लिंगायत समाजाच्या सभामंडपाचे काम, तसेच विविध शासकीय कार्यालयांचे नुतनीकरण या विकासकामांना वेग देण्यासाठी मागणीप्रमाणे पाठपुरावा केला जाईल.
या दौऱ्यात सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, बाणेगावचे माजी सरपंच बाळासाहेब पांढरे, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, शुभम शिराळ, किरण रुपनर, गजानन नगरे, अमोल पांढरे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गटाच्या सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here