
सरपंच व उपसरपंच हस्ते माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन
देसाईगंज/(गोलू ठेंगरी):- कुरूड येथील वाल्मीकी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या _नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा_ आज दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी कुरूड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रीती मडावी व उपसरपंच श्री शंकर पारधी यांच्या संयुक्त हस्ते, _माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत_ उत्साहात संपन्न झाला. लेखाशिर्ष २५१५-१२३८ अंतर्गत सन २०२४-२५ च्या निधीतून हे कार्यालय बांधण्यात आले आहे.
या प्रसंगी संस्थेचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नवीन कार्यालयामुळे मत्स्य व्यवसायिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, संस्थेच्या वाटचालीस नवसंजीवनी मिळणार असल्याचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमात माजी आमदार कृष्णा गजबे, सरपंच प्रितीताई मडावी, उपसरपंच शंकर पारधी, सदस्य विलास पिलारे, सदस्य प्रतिमा उके, अरुण राऊत, आदित्य मिसार, रमेश ठाकरे, रामचंद्र ठाकरे, मुखरु वाघधरे, मनोहर निमजे, विलास गोडेफोडे, पुरुषोत्त भजने, भास्कर कावळे व गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी _माजी आमदार कृष्णा गजबे_ यांचेसह ग्रामस्थांनी, पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्यालयाच्या निमित्ताने संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.















