prabodhini news logo
Home चंद्रपूर तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम

तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
62

चंद्रपूर – दि. 21 : दिनांक 20 नोव्हेंबर हा दिवस “Transgender Day Of Remembrance” जगभरात तृतीयपंथीय व्यक्तींवरील हिंसाचार विरुद्ध जनजागृती निमार्ण करण्यासाठी आणि हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यासाठी पाळला जातो. त्याचे औचित्य साधुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर येथील सामाजिक न्याय भवन येथे 20 नोव्हेंबर 2025 रोजी तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी हिंसामुक्त समाजासाठी जागरूकता व्याख्यान, लिंग संवेदनशिलता विषयक माहिती, तृतीयपंथीयाबाबतचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमामुळे तृतीयपंथीय समाजाला मानसिक व सामाजिक बळ मिळेल याबाबतचे सकारात्मक विचार मान्यवरांच्या हस्ते मांडण्यात आले.
अध्यक्ष म्हणुन सहाय्यक लेखाधिकारी दिपक धात्रक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगिता पोतले, अंजु बालमवार, विजेंद्र टेंभुर्णे, निधी चौधरी, श्री. गिरडे, प्रा. मनोज माकोडे, समाज कल्याण निरीक्षक स्मीता बहिरमवार, श्वेता लक्कावार तसेच कार्यालयातील कर्मचारी अनिल बोडे, सजल कांबळे, संजय बन्सोड, संदीप वाढई, गणेश खोटे, सुरज डांगे व मोठ्या संख्येने विद्यार्थी, बार्टी व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here