prabodhini news logo
Home ठळक बातम्या ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने स्मृतीशेष अविनाश च्या जन्मदिनानिमित्त बॅग,...

ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने स्मृतीशेष अविनाश च्या जन्मदिनानिमित्त बॅग, नोटबुक व पेनचे वाटप

0
172

वर्धा: ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धाच्या वतीने आगरगाव येथील पंचशील बुद्ध विहाराचे प्रांगणात ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा च्या वतीने समता सैनिक दलाचा सैनिक स्मृतीशेष अविनाश रत्नमाला नरेश लोखंडे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त पारधी बेड्यावरील व गावातील गरीब 150 विद्यार्थ्यांना नालंदा अकादमी वर्धा चे संचालक अनुप कुमार सर , विदर्भ सचिव रमेश निमसडकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य अनिल खडतकर, जिल्हा विधी सल्लागार तथा यशदा आयएस अकादमीचे संचालक एड. निखिल बुरबुरे, जिल्हा कार्यकारी सदस्य सुनील बाभळे, शाखाध्यक्ष पद्माकर कांबळे यांचे हस्ते शालेय बॅग ,पेन व नोटबुकचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर समता सैनिक दलाचा सैनिक स्मृतीशेष अविनाश रत्नमाला नरेश लोखंडे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना सलामी देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी नालंदा अकादमीच्या माध्यमातून उच्च शिक्षण देणारे नालंदा अकादमी वर्धा चे संचालक अनुपकुमार सर, पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे संस्कार वर्ग घेणारे अचिन पवार, सामाजिक कार्यकर्ते हिरामण वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक अनुपकुमार सर यांनी शिक्षण विषयक करियर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय विचार ऑल इंडिया समता सैनिक दलाचे विदर्भ सचिव रमेश निमसडकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक निखिल बुरबुरे, अनिल खडतकर यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य जिल्हा उपाध्यक्ष आशिष रत्नमाला नरेश लोखंडे यांनी केले. प्रेरणा गीत शाखा अध्यक्ष पद्माकर कांबळे, संचालन विशाल थुल ,आभार सुनील बाभळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिरामण वाघमारे, अरुण हाडके, अक्षय रामटेके, दिनेश थुल यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here