
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित विशेष युट्यूब काव्य सादरीकरण स्पर्धेच्या यशस्वी कवियत्री, लेखिका डॉ मंदाकिनी जवादे (भानसे) यांना सामाजिक संस्था नागपूर च्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन पुरस्कार सोहळा नागपुर येथील सभागृहात कला भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला “नाळ चित्रपटाची अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, मा. गिरीश पांडव, मदत संस्थेचे संस्थापक सचिव दिनेश वाघमारे, अध्यक्ष एड.निल लाडे इत्यादींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. मंदाकिनी जवादे यांना सातव्या वर्गात शिकत असताना पासुनच लिखाणाची आवड होती.कथा, कविता,लेख, नाटक इत्यादी लिखाणातुन त्या समाजप्रबोधन व सामाजिक कार्य करतात. तसेच डाॅ. मंदाकिनी जवादे या लाॅयन्स क्लब वर्धा मेडिकोज च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर व सचिव आहेत.लाॅयन्स क्लब च्या माध्यमातून वीस वर्षापासुन समाजकार्य चालुच आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईकांकडुन, लाॅयन्स क्लब मेडिकोजच्या सदस्य व पदाधिकारी यांच्या कडुन,तसेच शिक्षक वर्गाकडुन कौतुक व अभिनंदन करण्यात आले.















