prabodhini news logo
Home अमरावती रिटेल कर्ज मेळावा येत्या शुक्रवारी

रिटेल कर्ज मेळावा येत्या शुक्रवारी

0
97

गृह आणि वाहन कर्जावर विशेष मार्गदर्शन

अमरावती, दि. 26 : अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांच्या पुढाकाराने अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे रिटेल आऊटरीच प्रोग्राम अर्थात रिटेल कर्ज मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नागरिकांना गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि मोर्टगेज लोन यांसारख्या विविध रिटेल कर्ज योजनांची तसेच सध्या उपलब्ध असलेल्या व्याजदर सवलतींची सविस्तर माहिती देणे हा आहे.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष येरेकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, विविध शाखा व्यवस्थापक तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, शहरातील प्रमुख कार डीलर आणि बिल्डर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना यावेळी बँक अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांसंबंधी ऑन-द-स्पॉट मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामुळे कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेतील अनेक शंकांचे त्वरित निरसन होऊ शकेल.
सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून, इच्छुकांनी आपली उपस्थिती नोंदविणे आवश्यक आहे. अमरावती शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कर्ज योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here