
ग्यानचंद जांभूळकर यांचे प्रतिपादन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – न्याय ,स्वातंत्र ,समता आणि बंधुता तसेच संविधानिक विचारावर काही विकृत मनोवृत्तीचे लोक नेहमीच हल्ला करीत असतात यापासून आपण सावधान राहिले पाहिजे व सामान्य लोकांना सुद्धा सावधान ठेवले पाहिजे असे प्रतिपादन भंडारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त ग्यानचंद ताराचंद जांभुळकर यांनी व्यक्त केले. ते भागीरथा भास्कर विद्यालय टवेपार या ठिकाणी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिवस कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक रामटेके सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण पडोळे (ओबीसी सेवा संघ) हे होते .
ग्यानचंद जांभूळकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये 395 कलमे लिहिलेले आहेत व काही परिशिष्ट जोडलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात हे सर्व जगविख्यात आहे. परंतु काही लोक असे म्हणतात की, बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिलेलीच नाही ते दुसऱ्याने लिहिलेले आहे. आम्हाला त्यांना असे सांगावेसे वाटते की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमे का लिहिले राऊंड फिगर मध्ये 400 का लिहिले नाही राउंड फिगर मध्ये 390 का केलं नाही याचे उत्तर आहे पुण्यामध्ये जाऊन बघा महात्मा फुलांच्या घराचा नंबर 395 आहे म्हणून राज्यघटनेमध्ये 395 कलमे लिहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं की या देशाचा राज्यकारभार माझ्या गुरूंच्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराच्या चौकटींमध्ये चालला पाहिजे म्हणून राज्यघटनेमध्ये 395 कलमे लिहिलेले आहेत .
श्रीकृष्ण पडोळे यांनी सुद्धा कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. तसेच काही विद्यार्थ्यांचे भाषणे पण झाले. शिवम मते या विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकार केली होती. त्या विद्यार्थ्याला जांभूळकर यांनी स्वलिखित पुस्तक सप्रेम भेट दिले. कार्यक्रमाचे संचालन गोपाल सेलोकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हर्षा मॅडम यांनी केले.















