prabodhini news logo
Home कोपरगाव संविधान गौरव दिनाची व अशा कार्यक्रमांची गरज आज देशाला आहे – इंद्रभान...

संविधान गौरव दिनाची व अशा कार्यक्रमांची गरज आज देशाला आहे – इंद्रभान ढोमसे पोलिस पाटील सुरेगांव शहाजापूर

0
161

कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहाजापूर येथे संविधान गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे इंद्रभान ढोमसे पोलिस पाटील (सुरेगांव /शहाजापूर ) तर पेनचे वाटप मुख्याध्यापक रमेश निकम यांच्या हस्ते वाटप !

कोपरगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांनाकळावे यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात. म्हणून सकाळी ठीक साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांनी संविधानाचा गौरव म्हणून शहाजापूर गावामध्ये रॅली काढून संविधानाची प्रत घेऊन गौरवलेली काढण्यात आली . विद्याथ्याना संविधान वर चर्चा प्रश्न मंजुषा व्हीडीओ क्लिप विदयार्थ्यांना दाखाविण्यात आली . त्यानंतर विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पोलीस पाटील मा . इंद्राभान डोमसे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना कायद्याचा अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी अशा शिक्षकांची आज देशाला गरज आहे अशा कार्यकमांची गरज आहे . ज्या संविधानामुळे विद्यार्थ्यांना कायद्याचा शिक्षणाचा बोलण्याचा राहण्याचा फिरण्याचा लिहिण्याचा अधिकार दिला अशा उत्कृष्ट अशा संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलेत्या संविधानाची विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आज प्रामुख्याने गरज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये वाव मिळत आहे या संविधानामुळे आपला भारत देश चालतो आज एवढे जाती धर्म असूनही संविधानामुळे सर्वजण एकत्र आहेत खरोखर हा संविधानाचा गौरव आहे असे उद्गार ढोमसे यांनी काढले तर उपाध्यापक रियाज शेख यांनी संविधानाची उद्देशिका वाचून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .तर महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक रमेश निकम सर यांनी संविधानाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांना वही व पेन हे वाटप करत असतात .आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांना वहीचे व पेनाचे वाटप करतानाही सांगितले होते की विद्यार्थ्यांना आज येण्याची गरज आहे ज्या पेनामुळे आपण आपला अधिकार प्राप्त करू शकतो त्या पेनाचे महत्त्व कधीही कमी होऊ द्यायचे नाही आज बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्याच पेनामुळे संविधान लिहिले तेव्हा संविधानाची ताकद एवढी मोठी आहे की विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर पोहोचवण्याची ताकद ह्याच पेनामध्ये आहे असे आपल्या भाषणात रमेश निकम सर यांनी सांगितले .
यावेळी शहाजापूर पदाधिकारी बाळासाहेब वाबळे , वर्पे साहेब ,देशमुख साहेब , कदम साहेब , ग्रामस्थ पालक शाळेचे शालेय व्यवस्थापन सामिती अध्यक्ष बाळू माळी , निकम ताई विद्यार्थी गण आदी उपस्थित होते .सूत्रसंचालन रमेश निकम सर यांनी केले तर आभार उपाध्यापक रियाज शेख सर यांनी मांनले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here