
वसमत प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.26 नोव्हेंबर 2025 महात्मा फुले प्राथमिक शाळा वसमत व जवाहरलाल नेहरू विद्यालय वसमत या दोन्ही विद्यालय मार्फत सामाजिक न्याय विभाग याची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि,पुणे च्या वतीने तालुका वसमत येथे आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान रली काढण्यात येवुन संविधान चे महत्त सामान्य लोकांना व्हावे उद्देशाने बार्टि महासंचालक मा.सुनिल वारे साहेब समतादूत विभाग प्रमुख मा.बबन जोगदंड साहेब हिंगोली जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे सर याच्या मार्गदर्शना खाली दिं 26 नोव्हेंबर ते 2 डिंसेबर संपुर्ण महाराष्ट्र भर संविधान सप्ताह साजरा करण्यात येत असुन आजच्या संविधान दिनानिमित्त विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या नंतर शहरात संविधान रली काढण्यात आली संविधान बाबत घोषणा देण्यात आले या रली व कार्यक्रमाच्या वेळी बार्टी समतादुत गुरुनाथ गाडेकर, मिलीद आळणे शाळेचे मुख्याध्यापक बेंडे व्ही.आर. सह शिक्षक वसीम, कातोरे, शेख अलताफ, सवडंकर एन.आर ख़दारे, ए.एम. कुरेशी आवेज, सामाजिक कार्यकर्ते देवा सोनाळे हे सन्माननीय मान्यवर च्या उपस्थिती मध्ये रली शहरात संविधान रली काढुन लोकांना आकर्षक करून घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रम निमित्त विद्यार्थी शिक्षक व बार्टी समतादूत गाडेकर गुरुनाथ व मिलींद आळणे या यांनी आज भारतीय विकासा मध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या मुलभुत हक्काचे संरक्षण भारतीय संविधान देते या बाबत मार्गदर्शन व संविधान दिनाचे महत्व आपल्या मनोगतात व्यक्त करत असतांना आपण सर्वांनी भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र, बंधुता, न्याय, एकात्मता मुलतत्वाचा व विचाराचे अनुकरण करुन भारतीय समाजात एक निरपेक्ष व प्रज्ञाशिल व्यक्ती व्हावे समाजात समतोल राखता यावा यासाठी आपण सर्वानी नी प्रयत्न करावा असे मनोगतात गुरूनाथ गाडेकर सरांनी सागितले .या कार्यक्रमा ला संपुर्ण विद्यार्थी सकारात्मक प्रतीसाद देवुन शहारात मध्ये संविधान रली चे आयोजन यशस्वीरित्या संविधान दिन साजरा करण्यात आला.















