prabodhini news logo
Home ठळक बातम्या अस्थायी सब-स्टाफ ऋषिकेश राजू कांबळे या कामगारावर अन्याय प्रकरणी कामगाराचे बेमुदत लोकशाही...

अस्थायी सब-स्टाफ ऋषिकेश राजू कांबळे या कामगारावर अन्याय प्रकरणी कामगाराचे बेमुदत लोकशाही मार्गाने आंदोलनाची सुरुवात….

0
265

सांगली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – २६ नोव्हेंबर २०२५ युनियन बँक ऑफ इंडिया, अंकली शाखेत २०१८ पासून कार्यरत असणारे अस्थायी सब-स्टाफ कामगार ऋषिकेश राजू कांबळे यांना दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी कोणतीही नोटीस, चौकशी किंवा प्रक्रिया न पाळता बेकायदेशीररित्या तडकाफडकी सेवेतून कमी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

दरवर्षी २४०+ दिवसांची सातत्यपूर्ण सेवा, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश —
“Maintain Status Quo of Shri Rushikesh Kamble”
असताना स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी मनमानी करत नियमबाह्य निर्णय दिल्याचा आरोप युनियनने केला आहे.

या अन्यायाविरोधात आज मा. रावसाहेब सराटे (जिल्हा समन्वयक, युनियन बँक, सांगली) यांना युनियनकडून औपचारिक तक्रार-निवेदन देण्यात आले होते.

ऋषिकेश राजू कांबळे हे अनुसूचित जातीतील कामगार असून, त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिल्याने हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे.

२६ नोव्हेंबर २०२५, संविधान दिनापासून बेमुदत आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे.

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा यांनी घोषणा केली होती की,
२६/११/२०२५ पासून युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा अंकली येथे. पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे हे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहेत

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली युनियनचे स्पष्ट मत आहे की, “आमचे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून अन्याय, बेकायदेशीर निर्णय आणि कामगारांच्या हक्कांवरील गदा याविरुद्ध आहे.”

युनियनच्या प्रमुख मागण्या

1. ऋषिकेश राजू कांबळे यांची तत्काळ सेवेत पुनर्स्थापना

2. बेकायदेशीर कमी केल्यानंतरचा थकबाकी वेतन, बोनस व इतर सर्व लाभांची पूर्ण भरपाई

3. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित शाखा व्यवस्थापकावर शिस्तभंग कारवाई

4. औद्योगिक विवाद कायदा व 12th Bipartite Settlement नुसार न्याय देणे

ही कारवाई मा. प्रशांत वाघमारे (पश्चिम महाराष्ट्र महासचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून निवेदन संजय भूपाल कांबळे जिल्हा संपर्कप्रमुख यांनी सादर केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर. सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव तसेच शशिकुमार कोलप, बाळू कोलप, मानतेश कांबळे, उपस्थित होते.

युनियनने प्रशासनाला आवाहन केले आहे की, परिस्थिती शांततापूर्ण ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत आणि कामगाराला तातडीचा न्याय द्यावा.

२६ नोव्हेंबर संविधान दिन
कामगार न्यायासाठी, हक्कासाठी, समानतेसाठी
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य — सांगली जिल्हा मैदानात उतरली आहे यावेळी उपस्थित असणारे शशिकुमार कोलप, माझी सरपंच कीर्तिकुमार सावळवाडे, प्रसाद अन्नासो खवाटे, सुनील बी. पाटील, माणतेश कांबळे, विशाल कोलप, सुरगोंडा पाटील, मीनाक्षी कांबळे, मीरासाहेब मुल्ला, लक्ष्मी बिराजदार, बाळू कांबळे, बाळकृष्ण शिंदे, सचिन जाधव विविध संघटनेने पाठिंबा दर्शविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here