prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भारतीय संविधान

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भारतीय संविधान

0
91

ज्ञान दिले दान दिले समाजाला मान
महामानवा तुझे गातो गुणगान —!!

उभा होता पाठीशी बनून रक्षक
तुझ्या कर्तृत्वाला माझा सलाम एक
पेटविली ज्योत ही ज्ञानाची शान
भारतरत्न डॉ बाबासाहेब महान —!!

महामंत्र संविधान अधिकार हक्कासाठी
समान न्यायाचे कायदे दिले स्त्रीयांसाठी
तोडून बेड्या मुक्त केले गुलामगिरीतून
जागविला देश अज्ञानाच्या अंधारातून —-!!

पिऊन पाणी ओंजळभर चौदार तळ्यावर
शमवीली तहान अन्याय अत्याचार
भेदभाव जाळीला होते संघर्षमय जीवन
प्रज्ञासूर्य उगवला प्रकाशला अभिमान —!!

चमकतो एक तारा देशाच्या मनामनात
करुन जयजयकार राहू समाधानात
त्रिवार वंदना कोटी कोटी प्रणाम करुन
संविधान दिन लाभले भाग्य गाऊ आंनदान—!!

सौ.सविता संजय भोयर
राजुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here