
दिवस सुखाचा
साऱ्या भारतीयांचा
चला साजरा करू
26 नोव्हेंबर संविधानाचा…
तुला मिळाले नवे अस्तित्व
गुलामीत खितपत होता पडला
दीडशे वर्षाच्या हुजरेगिरीने
आपला बापजादा सडला….
एक जगण्याची दिशा
अथक प्रयत्नांनी बाबासाहेबांनी
395 कलमे लिहून
साकारली संविधानाची निशाणी…
संपविली राजेशाही
मोडली मक्तेदारी
सामान्य माणसाला राजा बनवलं
समतेची मशाल पेटवली घरोघरी…
संविधान तुझे रे सामान्य माणसा
जगणेच झाले तुझे सोन्याचे
राज्यघटनेत हक्क आणि कर्तव्य
जप रे तू अस्तित्व तयाचे….
सुदृढ लोकशाहीचा उत्सव
साजरा करू चला रे
न्याय समता स्वातंत्र्य बंधुत्व
टिकवण्याची जबाबदारी आहे रे….
जय संविधान जय भारत
उद्घोष पवित्र खंबीर मनाचा
मनोज शत शत करतो नमन
सैनिक भिम बाबाचा..
गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे.















