
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – मुलुंड/मुंबई : भिम सेना बुद्ध विहार डम्पिंग रोड मुलुंड येथे परमपूज्य नेते बोधीसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन दिनांक 6/12/2025 रोजी अभिवादन करून साजरा केला.
सुनिताताई शेश्वरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तसेच उपस्थित असलेल्या महिलांनी मेणबत्ती प्रज्वलित करून बुद्ध वंदना घेण्यात आली, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी आणि बहुजन समाजासाठी केलेले कार्य,
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शाळेत शिक्षण घेत असताना जातियवेस्थे चटके सहन करावे लागले वर्गात इतर विद्यार्थ्यांन पासून लांब बसून शिक्षण घ्यावे लागत असत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनाशी जिद्द बाळगून शिक्षण घेत राहिले हालाखिच्या परिस्थितीत त्यांचे वडील रामजी बाबा आणि माता रमाई यांनी साथ दिली लंडन अमेरिका जपान सारख्या देशात जाऊन शिक्षण घेतले 32डिग्र्या संपादन केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरवले असते तर स्वतः साठी आणि कुटुंबासाठी जगायचे तर तसे करू शकले असते परंतु त्यांनी लहान पना पासून जातियवेवस्थाचे चटके सहन केले होते त्याची त्यांना जाणीव असल्याने शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी व समाजासाठी लढले संघर्ष केला.
मागासवर्गीय समाजातील लोकांना पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता दिनांक 20/मार्च/1927रोजी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आपल्या अनुयायांना सोबत घेऊन केला तेव्हा पासून चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी खुले झाले, आम्हाला मंदिरात प्रवेश नव्हता काळाराम मंदिराचा सत्याग्रह पाच वर्षे सुरू होता आंदोलन करुन मंदीर प्रवेश केला,
पिपल एज्युकेशन सोसायटी निर्मिती केली मुंबई मध्ये सिद्धार्थ कॉलेज औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज यांची स्थापना करुन लाखो विद्यार्थी आज शिक्षण घेऊन डॉक्टर वकील इंजिनिअर झालेत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून महिलांना राष्ट्रपती पंतप्रधान इतर क्षेत्रात प्रगती पथावर जाण्याचा मान मिळाला,
लंडन मधील गोलमेज परिषदेत चर्चा झाली तेव्हा शिक्षण घेतलेले आणि इन्कम टॅक्स भरत असतील अशा लोकांना मतदान करण्याचा अधिकार असावा,
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत सांगितले आमच्या देशातील लोक अशिक्षित आहेत आणि इन्कम टॅक्स भरण्या इतपत नाहीत सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे गरीब असो किंवा श्रीमंत ज्या व्यक्तीचे वय 21असेल अशा लोकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे व मिळवून घेतला.
1935साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला नाशिक येथे घोषणा केली की मी ज्या धर्मात जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते पण मी जो धर्म स्वीकारेल ते माझ्या हातात आहे वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला तब्बल एकवीस वर्षांनी शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा बौद्ध धर्म दसराच्या दिवशी म्हणजे दिनांक 14/ऑक्टोबर/1956रोजी नागभूमी नागपूर येथे पाच लाख अनुयायांना सोबत घेऊन भंते चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धमाची दीक्षा घेतली आणि स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख अनुयायांना बौद्ध धमाची दिक्षा दिली.
दिनांक 6/डिसेंबर/1956रोजी तुमचे आमचे उद्धार कर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन झाले त्यांनी देशासाठी आणि समाज हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि संघर्ष केला त्यांचे उपकार कदापी विसरु शकत नाही म्हणून देशातून लाखो लोक चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात.
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता विजय तुकाराम देठे यांनी सांगितली तसेच भिमसेना मित्र मंडळ सेक्रेटरी विकास जगताप यांनी भिम सेना बुद्ध विहार महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रम करण्यासाठी उपलब्ध करून दिला.सरणते घेऊन कार्यक्रम समाप्त झाला.














