
S.I.T चौकशी बाबत डॉ. चंद्रकांत पुलकुंडववार यांची भेट
कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – शिक्षक भवन गांजवे चौक पुणे येथे एक बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये राज्यभरात झालेल्या शालार्थ आयडी घोटाळा बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित केले समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनामध्ये सन्माननीय विधानसभा व विधान परिषद सदस्यां मार्फत एसआयटी चौकशीची कार्य कक्षा वाढवण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यावर चर्चा झाली तसेच राज्यभरात अनेक भागात ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत तेच अधिकारी चौकशी अधिकारी आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अनेक निलंबित अधिकारी पुन्हा कार्यकारी पदावर येऊन तेच काम करत आहेत त्यामुळे तक्रारदार शैक्षणिक कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल? यावर गंभीर चिंतन करण्यात आले पुढील काळामध्ये एसआयटीची कार्य कक्षा वाढवून चौकशीगतिमान कशी होईल यासाठी पाठपुरावा सुरू राहणार आहेआज राज्यभरातील समितीच्या सदस्यांनी एसआयटी प्रमुख डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांना भेटून निवेदन दिले त्यांनीअसे सांगितले की सर्व निवेदनाची गंभीर दखल घेऊन दुसऱ्या अधिकाऱ्या मार्फत क्रॉस चेकिंग होईल यातून कोणीही सुटणार नाही असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले माजी आमदार नागो गाणार यांनी एसआयटी ला निवेदनाची प्रत दिली व कार्यपद्धती गतिमान करण्याबाबत निवेदन दिले आमदार संजय उपाध्याय यांनीही निवेदनाची प्रत एस आय टी प्रमुखांना पाठवलेली आहे राज्यभरातील तक्रारी या आयुक्त कार्यालयामध्ये आपण मेलने पाठवून दिल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल व दोषीवर कारवाई केली जाईल असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले शिष्ट मंडळामध्ये आदरणीय शिवनाथ दराडे मुंबई महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जनार्दन जंगले टि डीएफ अध्यक्ष मुंबई डॉ एस एस राणे जळगाव भैय्यासाहेब मोरे चाळीसगाव दिलीप जैन अमळनेर सुनील वडतकर मुंबई प्रकाश घोळवे पुणे संदीप फणसे सातारा खेडकर साहेब पुणे राजकुमार छाजेड अमळनेर सुदर्शन नाईक पुणे प्रविण खाडे साहेब ठाणे, सचिन गोडसे, सुदर्शना त्रिगुणाईत इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.















