prabodhini news logo
Home चंद्रपूर निलजई खान परिसरात एड्स जनजागृती पथनाट्य व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

निलजई खान परिसरात एड्स जनजागृती पथनाट्य व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

0
360

सुविद्या बांबोळे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई; जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर; नोबल शिक्षण संस्था मार्फत संचालित मायग्रंट प्रकल्प, चंद्रपूर तसेच राजीव रतन हॉस्पिटल, घुगुस (वेकोली) यांच्या संयुक्त विद्यमाने निलजई खान परिसरात एड्स व एचआयव्ही जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात डॉ. शालीन चौधरी व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरण्य संस्थेच्या कलावंतांनी पथनाट्याच्या माध्यमातून एड्स आणि एचआयव्हीबाबत जागरूकता निर्माण केली. तसेच नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती मेकेला, डॉ. विजय सिंग, मायग्रंट प्रकल्पाच्या समन्वयक माधुरी डोंगरे, प्रवीण नायर, रुची कुरखेडे, संदिप धोबे, विद्या झांबरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुवर्णा मानकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपक्रमातून परिसरातील नागरिकांना आरोग्य, सुरक्षितता आणि एड्स प्रतिबंध याबाबत उपयुक्त माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here