prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

0
82

ज्या संसारासाठी खस्ता खाई
सहन करता व्यर्थ न बलिदान
सागंताना भीमशक्तीचा महिमा
रमाई भीमरावाचाच अभिमान

रमाई झाली भीमाची सावली
शिक्षणाचा दाखवीत सन्मार्ग
सांभाळून संसार अन संस्कार
अष्टभुजाधारी नारी चढे मार्ग

सौंदर्याची खाण ही वीरांगना
हिमालयागत घेत उचं भरारी
घर अन नोकरी सांभाळून ही
उंच उंच शिखरे ही पार करी

निडर भिमाच्या लेकी आम्ही
नारीशक्तीचा सार्थ अभिमान
घडविले इथे महान देशभक्त
आपला देश माझा अभिमान.

सुरेंद्र यशवंत पाटील,ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here