prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महापरिनिर्वाण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महापरिनिर्वाण

0
111

सहा डिसेंबर छप्पन साली
ही काळोखी रात्र होती
आमच्या डोईवरचे छत हे
कोसळले हे ध्यासातच नव्हती

पोरके झालो बाबा तुजविण
आहे तुमच्या परतण्याची आस
पण नाही असं होत काही
तुमच्या येण्याचेही सरले भास

काळरात्र ती करून गेली
माझ्या बाबांना निवांत जगातून
सागराच्या लाटेने नतमस्तक केले
भिमरायाच्या पावलांना वंदन

विचारच राहिले आता
दिलेला वारसा माझ्या भिमरायाचा
चिर निद्रेनी झोपी गेले मानवा
खंत नको करू घे विचारसरणी त्यांचा

कोटी वंदन करूनीया आजही
नाही देत कोणी माझ्या बाबांना
कुठे शोधू तुजला बाबा माझ्या
अश्रुती देते ही मानवंदना

रंजना भैसारे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here