prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भीम रायाची लेखनी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भीम रायाची लेखनी

0
98

किती हे विद्वान, झाले महान जीवनी
साऱ्या जगात गाजली भीमरायची लेखनी ll ध्रु ll

त्या चवदार तळ्यावर
नवा इतिहास घडविला
आपल्या सामाजिक क्रांतीचा
तो झेंडा फडकाविला
खुले केले दलितांना, पाणी ओंजळ पिऊनी ll1ll

केले प्रहार रूढींवर
होत्या अन्याय कारक
पुढे होऊन झालात
मूक समाजाचे नायक
ज्योत क्रांतीची पेटविली,
मनुस्मृती ही जाळूनी ll2ll

प्रकांड पंडित शोभले
ग्रंथ संपत्ती निर्मिली
समता स्वातंत्र्य बंधुता
सर्व जनास अर्पिली
शिल्पकार ते देशाचे,
दिली घटना लिहूनी ll3 ll

त्या नागपूर भूमीत
दिक्षा धम्माची घेतली
शांतीदूतची आठवण
साऱ्या देशाला समजली
बुद्ध आणि त्याचा धम्म,
पवित्र तथागत चरणी ll4ll

होती क्रांतीची मशाल
अन् ‍ तेजाची तलवार
भल्याभल्यांनी घेतली
रणांगणी त्या माघार
शाई रविनद्रा लोपली,
सहा डिसेंबर दिनी ll5ll

रविकुमार लक्ष्मी सोमा जाधव
करक राजापूर रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here