
शारदा विद्यालयात मुख्याध्यापकांच्या सभेत प्रतिपादन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – शारदा विद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे तालुक्यातील सर्व व्यवस्थापनातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान अर्चना माटे, गट शिक्षण अधिकारी (प. स. तुमसर) यांनी भूषवले. तर शिक्षण विस्तार अधिकारी टी. आर. पुष्पतोडे तसेच यजमान व आयोजक मुख्याध्यापक राहुल डोंगरे, शारदा विद्यालय तुमसर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मुख्याध्यापक राहूल डोंगरे यांचे हस्ते अतिथींचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षण विस्तार अधिकारी टी. आर. पुष्पतोडे यांनी माझी शाळा – सुंदर शाळा टप्पा ३ उपक्रमाचे मूल्यांकन, तयारी, अंमलबजावणी आणि विविध सुधारणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.गट शिक्षण अधिकारी अर्चना माटे यांनी विकसित भारत अभियान, विविध शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शालेय पोषण आहार, नवोदय परीक्षा, शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविणे, माहिती फलक अद्ययावत ठेवणे तसेच शाळेतील स्थापन समित्या व इतिवृत्त लेखनाबाबत स्पष्ट व सखोल सूचना दिल्या.
MIS समन्वयक रामरतन भाजीपाले यांनी Student Portal व School Portal वरील नोंदी, अपडेट्स आणि अचूक माहिती भरण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.विषयसाधन व्यक्ती एस. डी. शरणागत यांनी मूल्यवर्धन शिक्षणावर माहिती देत सभा कुशलतेने संचलित केली.
गट शिक्षण अधिकारी मा. माटे यांचा अधिकृत कोट :
“विद्यार्थीहित आणि शाळेची गुणवत्ता हा आमच्या सर्व कामकाजाचा केंद्रबिंदू आहे.”
तुमसर तालुक्यातील शिक्षण व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक आणि गुणवत्तावर्धित करण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. शैक्षणिक उपक्रम, तांत्रिक पोर्टल्स, सुरक्षा व्यवस्थापन व प्रशासनिक शिस्तबद्धता यांवर विशेष भर देण्यात आला.उत्तम आयोजनामुळे शारदा विद्यालयाची व्यवस्था सर्वांकडून प्रशंसनीय ठरली.















