prabodhini news logo
Home ठळक बातम्या भीम आर्मी च्या वर्धा जिल्हा प्रमुख पदी प्रदीप उर्फ (रावण) कांबळे यांची...

भीम आर्मी च्या वर्धा जिल्हा प्रमुख पदी प्रदीप उर्फ (रावण) कांबळे यांची नियुक्ती

0
200

पद्माकर कांबळे जिल्हा प्रतिनिधी वर्धा – वर्धा येथील भीम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा प्रमुख पदी प्रदीप उर्फ (रावण) कांबळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्याचे वर्धा जिल्हा चे प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांनी त्यांचे शाल, व पुष्प गुच्छ देवून अभिनंदन केले. मुंबई येथील मालाड येथे जिल्हा कार्यालयात दिनांक 8 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्र चे प्रभारी अनिलजी धेनवाल व महाराष्ट्र चे अध्यक्ष अशोकजी कांबळे,थोरात साहेब,गायकवाड साहेब, झुणके साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले. आज दिनांक 9 डिसेंबर ला सकाळी त्यांचे विदर्भ एक्सप्रेस ने वर्धा रेल्वे स्टेशनला आगमन झाले.त्यानंतर त्यांचे वर्धा येथे भीम आर्मी कार्यालयात त्यांचे प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांनी शाल, व पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राजु थूल सामाजिक कार्यकर्ते वर्धा,अमोल तामगाडगे,आशिष सालोटकर, समीर नाईक, अक्षय बहादुरे, सुरज गंगम वाल, भीमराव गवळी, अल्केश पानबुडे, निखिल नाईक, अजय अवथरे, विकी वाघमारे, सुरज मून , संघशील धनविज, श्याम पोपटकर इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here