
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 21 डिसेंबर 2025 रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील आगामी 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Election) होणारी मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने, आयोगाने हा बदल केला आहे.
परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षार्थींनी या नवीन तारखांची नोंद घ्यावी :
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025: आता 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित केली जाईल.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025: आता 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित केली जाईल.















