
एक लाखांची बक्षिसे
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिरोंचा दि लेजेंड क्रिकेट प्रीमियर लीग चषक भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे गुरुवार (दि.11 डिसेंबर) जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गट अध्यक्ष तथा गोंडवाना सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम यांच्या हस्ते उदघाटन झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्लीवार,राष्ट्रवादी काँग्रेस नेते बानय्या जनगाम,माजी जिल्हा परिषद सभापती जयसुधा बानय्या जनगाम, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नगरसेवक सतीश भोगे,महिला व बाल कल्याण समिती सभापती नपं पदमा भोगे, नगरसेविका सपना तोकाला,माजी पंचायत समिती उपसभापती कृष्णामूर्ती रिक्कूला,सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान,ओमप्रकाश ताटीकोंडावार, वेंकटेश पुजारी, फाजील पाशा, सत्यनारायण चिलकामारी, सरपंच अजय आत्राम,समय्या तोकाला, लोकमत पत्रकर नागभूषणम चाकीनारपवार, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला,रमेश पोट्टाला,गणेश राच्चावार उपस्थित होते.
करंडकातील पहिला सामना *पाशा इलेव्हन विरूद्ध एसीसी गंगापुत्र* यांच्यात झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटचे पदाधिकारी व विविध पक्ष व संघटनेचे प्रमुख व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.सिरोंचा तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे इस्माईल शेख यांनी सूत्रसंचालन केले. शहर व ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना क्रिकेटची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, होतकरू व प्रतिभावान शहरी व ग्रामीण खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती.
युवकांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मैदानावर आले पाहिजे,असे मत सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केले. अशा स्पर्धांच्या माध्यमातून युवकांचा उत्साह वाढतो तसेच केवळ खेळाडूच नव्हे तर संघातील पंच, तसेच मैदान तयार करणारे यांच्या कौशल्यालाही वाव मिळतो.















