prabodhini news logo
Home ठळक बातम्या राज्यातील महार वतन जमीनी मुळ मालकांना परत देण्याची भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर...

राज्यातील महार वतन जमीनी मुळ मालकांना परत देण्याची भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांची मागणी

0
407

सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्रातील महार वतनी, इनामी, गायरान जमीनी प्रस्थापित धनदाडग्यांनी बेकायदेदशीररित्या बळकावल्या आहेत. राज्यात सुमारे साडेपाच लाख एकर जमिनी ह्या महार वतनी जमीनी असून त्या मुळ मालकांना परत देण्यात याव्यात अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की या महार वतन जमिनींना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज तसेच ब्रिटीश काळात शौर्य गाजवलेल्या महार, मांग समाजातील लोकांना उदरनिर्वाहासाठी बक्षीस म्हणून देण्यात आल्या होत्या. परंतु बहुतांश ठिकाणी शिक्षण सम्राट, साखर सम्राट आदी गब्बरगंड लोकांना त्या जमीन बेकायदेशीररित्या हाडप करून त्या ठिकाणी मोठ मोठ उद्योग धंदे व शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत. त्यामुळे गावखेड्यात राहणाऱ्या महार समाजावर उपासमारीची वेळ येऊन तो उदरनिर्वाहासाठी भटकंती करत आहे.
या प्रकरणाची शासनाने जिल्हानिहाय समिती निर्माण करून प्रत्येक जिल्हा, तालुका व गावनिहाय महार वतनी जमीनी शोधून त्या जमिनींचे जाहिर प्रसिध्दीकरून करून त्या मुळ मालकांना (पुर्वआश्रमीचे महार व आत्ताचे बौध्द) यांना परत मिळाव्यात व ज्या जमिनीवर धनदांडग्या लोकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून वहिवाट करीत आहेत. या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत, ही प्रमुख मागणी आहे.
तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही उत्तरेश्वर कांबळे यांनी दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here