prabodhini news logo
Home अहेरी प्रशासनाचे दुर्लक्ष; आलापल्लीत निकृष्ट रस्ते कामाला ग्रामस्थांचा विरोध; अक्षय करपे नेतृत्वाखाली कामा...

प्रशासनाचे दुर्लक्ष; आलापल्लीत निकृष्ट रस्ते कामाला ग्रामस्थांचा विरोध; अक्षय करपे नेतृत्वाखाली कामा ला ब्रेक

0
147

त्रिकांत डांगरे आलापल्ली शहर प्रतिनिधी 8669198535 – ​आल्लापल्ली येथील मुख्य रस्त्याची वर्षभरातच दुरवस्था झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी अखेर आक्रमक पाऊल घेतला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा एकदा अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास येताच, अक्षय करपे तर्फे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी हे काम थांबवले. “दर्जेदार काम करा, अन्यथा काम थांबवा ,” असा इशारा यावेळी कंत्राटदाराला देण्यात आला.​वर्षभरातच रस्त्याचीचाळणआल्लापल्ली गावात अवघ्या एक वर्षापूर्वी नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने तिचा अक्षरशः चुरा झाला असून, यामुळे संपूर्ण गावात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.​अपघातांचे सत्र आणि विद्यार्थ्यांचे हाल ​रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावत असून, उखडलेल्या गिट्टीमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना ताज्या आहेत. अपघातांचे सत्र वाढल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.​दुरुस्तीच्या नावाखाली ‘वरकांती’ मलमपट्टी
​रस्त्याच्या या भीषण दुरवस्थेनंतर प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, हे काम करतानाही पुन्हा एकदा जुन्याच पद्धतीचा अवलंब करत निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याचे समोर आले. ही बाब लक्षात येताच अक्षय करपे तर्फे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत काम रोखून धरले.गावाचा पैसा अशा प्रकारे पाण्यात जाऊ देणार नाही. कंत्राटदाराने कामाचा दर्जा सुधारावा. जर काम उत्कृष्ट दर्जाचे होणार असेल तरच करावे, अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल.” अक्षय करपे तर्फे, सामाजिक कार्यकर्ते ​ग्रामस्थांची एकजूट ​यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. जोपर्यंत कामाची गुणवत्ता सुधारली जात नाही आणि जबाबदार अधिकाऱ्यांकडून हमी मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली त्यानंतर त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागीय अधिकारी अतुल ढोले यांनी उपस्थित झाले कामाची गुणवत्ता वाढून देऊ आणि काम चांगले करू असं अक्षय करपे यांना सांगितले आता संबंधित विभाग यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here