
दोषींवर कारवाई नाही तर शिवसेनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – WCL वणी एरिया अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजात बोगस बिल, अनधिकृत पेमेंट व अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या गंभीर प्रकरणी शिवसेनेच्या वतीने GM WCL वणी एरिया यांना आज निवेदन देण्यात आले.
स्वरा इलेक्ट्रिकल वर्क व त्रिशा कारपेंटर अँड फॅब्रिकेशन वर्क या नावाने सादर करण्यात आलेल्या बिलांमधून WCL मधीलच काही कर्मचारी खासगी कामे करून बेकायदेशीरपणे बिल सादर करत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप युवासेना लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा यांच्या वतीने करण्यात आला.
या प्रकरणात
🔴 किती वेळा बिल सादर झाले ?
🔴 कोणत्या अधिकाऱ्यांनी बिल मंजूर केले ?
🔴 कोणाच्या खात्यात पेमेंट झाले ?
🔴 GST, PAN शिवाय बिल कसे पास झाले ?
या सर्व बाबींची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
या निवेदनाची गंभीर दखल घेत GM साहेबांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल व त्यांच्यावर निलंबनाची कारवाही करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले.
मात्र, जर चौकशीला वेळकाढूपणा करण्यात आला किंवा दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
हे निवेदन युवासेना लोकसभा सचिव सुरज शाहा यांच्या नेतृत्वात देण्यात आले व युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
शिवसेना ही भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरून लढणारी संघटना असून, या प्रकरणातील दोषी कर्मचारी, अधिकारी व मध्यस्थ यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.















