
गंध सुगंध मातीचा
पावसाची सर बरसली
वातावरण जाहले मंद धुंद
तप्त धरा सुखावली
स्पर्श होतसे जलधारांचा
वर्षावात चिंब भिजली धरती
मृदगंधाने धरा सुखावली
ओली ओली झाली तप्त माती
त्या सुवासाने वातावरण होते सुगंधी
वैशाख वणवा शांत होतो
आणि परीसर होतसे स्वच्छंदी आनंदी
काळ्या मातीत बीज अंकूरतो
दरवळे मृदगंध आसमंती
मोर पिसारा फुलवून नाचतो
हिरव्या गार आच्छादनाचा
जणू मऊ मऊ गालिचा पसरतो
पहिल्या पावसाचे कौतुक आगळे
नित्य नेमे दरवर्षीप्रमाणे
त्याच उत्साहाने मन आनंदते
नेहमी दिसते निसर्गाचे रुप वेगळे
(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे















