prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुगंध

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सुगंध

0
94

फुलांमधील सुगंध देवाचे लेणे
गंधीत करीतो तनामना
परिसर सगळा भारावतो
उधळण प्रसन्नतेची जना.(1)

सुगंध पाऊस शिंपल्या मातीचा
ओढ लावितो जीवाशीवा
तृप्त होता धरणीमाता
आकाशाचा सहवास हवाहवा. (2)

सुगंध चुलीवरच्या भाकरीचा
देवीसम मातेच्या ममतेचा
सुगंध शेतकऱ्यांच्या घामाचा
गंध शिवारातील
हिरव्यागार पिकांचा.(3)

सुगंध प्रेमाच्या नात्यांचा
शब्दातीत अपूर्वतेचा
प्रेम, वात्सल्य, मैत्री,आदर
जीवन बागेतील रोपांचा.(4)

सुगंध किर्तीचा, सुगंध सद्गुणांचा
साज मानवतेचा रुपेरी
गुण गंध शिंपीत जाता
गंधाळतो मन गाभारी.

अंजली गरगटे.(पुणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here