prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – कीर्तीचा सुगंध

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – कीर्तीचा सुगंध

0
110

कर्तुत्वाचा गंध तुझा
दरवळे सभोवार,
धन्य झाले आई बाबा
गुणी जन्मा आला पोर.।।1।।

संस्कारांचे बाळकडू
जीवनाच्या घडणीला,
दिनरात कष्ट करी
पोरी बाळी शिक्षणाला.।।2।।

आनंदाला पारावार
आज उरलाच नाही,
झाले गगन ठेंगणे
हर्षतात दिशा दाही.।।3।।

कर्म करी सेवाभावे
नसे कोणताच स्वार्थ,
जन्म वाही जनासाठी
जीवनाचा शोधी अर्थ.।।4।।

पुण्य हवे नशिबाला
जन उपकार करा,
अलवार सुगंधात
न्हातो आसमंत सारा.।।5।।

सौ. उज्ज्वला राजेंद्र यादव
हडपसर, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here