
“गाडगेबाबा” हे त्यांचे नाव नव्हते, तर त्यांच्या कार्यामुळे व वेशभूषामुळे त्यांना मिळालेले एक लोकप्रिय संबोधन होते. ते स्वतः ला गाडगे महाराज म्हणवून घेत नसत. दरवर्षी संत गाडगेबाबा यांची गणपतीवर आधारित एक कविता वाचण्यात येते, तशी ती कविता दरवर्षी गणपती उत्सवात व्हॉट्सअपवर सारखी फिरत असते, कविता तशी अंध भक्तासाठी महत्वाची
व साध्या सोप्या सरळ भाषेत अगदी गाव खेड्यातील
गावठी माणूसही अंधश्रध्देचा ठाव घेईल व लक्षात येईल अशीच ती कविता आपल्या मनाचा दृष्टीकोन समजण्याचा असला तर त्यावर वादविवाद न उठवता खरोखर गाडगेबाबा आlपल्या भोळ्या भाबड्या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठीच सांगतात व ते पटण्यासारखेच असते अशी मानसिकता तर्कशुद्धीच्या आधारावर तरी व्हावयास हवी .
अशी ती कविता थोडक्यात….
मळापासून कधी कुणी जन्म घेत असतं का ?
एक मुर्ती तयार व्हावी एवढा मळ कुणी अंगावर ठेवतं का?
बाप मुलाले ओळखत नाही असं कुठं होईल का ?
सांगे माले देव कुळला निरपराध पोराले मारेल का?
नुकत्याच जन्मलेल्या बाळाले हत्तीच डोकं लागल का ?
डोकं हत्तीच लावूनी तो माणूस बनून वागेल का?
सांग आते , भोळ्या जनतेले का मुर्ख केले
असा जवाब तु त्याले मागशिल का ?
अंध भक्तीची काळी पट्टी तुही
मेंदूवरून दूर करशील का ?
इतक्या साध्या सोप्या सरळ व परखड भाषेत एखादा
सुज्ञ सुशिक्षित माणूस ही लिहिण्याचे धाडस करणार नाही.
गाडगेबाबा कधीही शाळेत गेले नाही. कधी कोणते
पुस्तक वाचले नाही. फक्त हातात झाडू घेऊन गाव स्वच्छता, व अंधश्रद्धेची मानवी मनात असलेली घान
आपल्या तुटक्या मुटक्या शब्दातून भजन कीर्तनातून
साफ करण्याचे काम केले. आपली अर्तज्ञानी विध्वता
त्यांनी तर्कशुद्धीच्या बळावर जगासमोर मांडली.
कोण्या शाळेत गेले होते गाडगेबाबा कोणती डिग्री
कोणती पदवी घेतली होती त्यांनी, पण त्यांच्या ज्ञानाचा
कळस विध्वतेच्या यशोशिखरावर पोहचलेला दिसतो.
गोधडी वजा फाटक्या तुटक्या ठीगळाच्या कपड्यात नेहमी
वावरून गाव स्वच्छतेचे धडे गिरवले व मोठमोठ्या
विद्वानाना विचार करण्यास भाग पाडले ही सर्वसाधारण
बाब निश्चितच नव्हती. समाजाचे हित कशात आहे.
समाज अंधश्रद्धेमागे का पळतो, रिती रिवाज, रूढी
यातून समाज कसा सुटेल यावर तर्क विवेक बोधात्मक
विचारातून समाज मनाला शुद्धतेचा मार्ग दाखविण्याचे
काम गाडगेबाबानी केले. समाज मनाला त्यांच्या विचाराची
भुरळ पडली होती. त्यांच्या बोलण्यातून सत्य उलगडत असे
देव धर्म व अंधश्रध्देवर परखड वार करत व “गोपाला
गोपाला देवकीनंदन गोपाला ” याच नामस्मरणाचा
जयघोष करून जमलेल्या जनसमुदायास स्फुर्तीचा जागर
करून उत्साह प्रोत्साहन देण्याचे काम ही करत.
गाडगेबाबा यांचा देव लोकांमध्ये रममाण होणारा होता
माणसामध्ये देव पाहणारे संत गाडगेबाबा जन मनावर वेगळा ठसा उमटवून गेले. माणूस भौतिक दृष्ट्या
सुखी संपन्न व्हावा अंधश्रद्धेत भरकटू नये म्हणून जत्रा यात्रेतही देवाचे दर्शन न घेता स्वच्छता अभियानातून अंधश्रद्धेचे महत्त्व पटवून देत गाडगेबाबा कृतीशील संत होते. आधी केले मग सांगितले, गावाची स्वच्छता केल्याशिवाय ते जेवनही स्विकारत नसत. त्यांचे किर्तन कल्याणकारी प्रबोधनकारी असे. माणूस अंधश्रद्धा रूढी परंपरेमुळे कुठलेही हीत न साधता कसा गोवला जातो याचे ज्ञान गाडगेबाबाना निश्चितच होते.
महाराष्ट्र राज्यातील समाजसुधारक व समाज प्रबोधन
कार, किर्तनकार , संत त्यानी स्वेच्छेने साधी राहणी
स्विकारली. विसाव्या शतकातील समाज सुधार म्हणून
आंदोलनात ज्या महापुरूषाचा सहभाग आहे ..त्यापैकी
एक गाडगेबाबा. ….. चोरी करू नका ,व्यसणाच्या अधीन
होऊ नका ,देवा धर्माच्या नावे नवस रोठ करू नका,स्वछता
प्रामाणिकपणा, भूतदया यावर भर देत देव दगडधोंड्यात नाही तर माणसात आहे . रंजल्या गांजल्याची सेवा , भुकेलेल्याले जेवन अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी पाजा,अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. अशी आर्ततेची हाक समाजाच्या मनामनात पोहचविण्याचे कार्य शेवटच्या क्षणापर्यंत करत राहिले.
देव धर्मात अडकलेला भोळा भाबडा समाज उच्च वर्णियाच्या तावडीतून कसा सुटेल याच विचाराच्या परिपक्वतेतून गाव खेड्याची भटकंती पाई प्रवास करून रात्रंदिवस ज्ञानप्रवर्जन करत राहिले. दीनदुबळ्या मनाची हाक एकली,समाजात होत असलेला अन्याय अत्याचार
अनिती दूर करण्यासाठी आयुष्यभर ते झगडत राहिले
पण त्यांची आर्ततेची हाक आज समाजाने स्विकारली
का…? सत्तर ऐंशी वर्षात आमच्यात किती फरक पडला
देव… देव करणे नवस रोठ करणे कोणी सोडले का ?
तर…. नाही ; कुणी म्हणतो आमचं कुळदैवत आहे ते
कसं सोडून द्यायचं, कुणी म्हणते पुर्वी जे आपले पुर्वज
करत होते ते उगिच का, आपण चार पुस्तके वाचले म्हणून
सर्व संस्कार संस्कृती रूढी परंपरा विसरून जायचे का?
नका ना विसरू….. पण तुम्ही जर चार पुस्तके वाचली
असतीलच , तर तुम्ही सुशिक्षित निश्चितच आहात, तुम्ही
सुशिक्षित आहात म्हणजे ज्ञान संपादन करण्याची विचाराची
तर्क शुध्द बुद्धी निश्चितच तुमच्या कडे आहे. म्हणजे तुम्हाला
खऱ्या खोट्या गोष्टीचे परिक्षण करता येते तेही तुमच्या
अंगी असलेल्या ज्ञानामुळे मग सत्यात उतरायला सत्य
जानायला काय हरकत आहे . सत्याचा मार्ग अवघड
असेल, पण निरर्थक नाही. जिथे आत्मशुध्दी असेल
तिथे कशातही अडकून पडण्याची गरज काय….?
गाडगेबाबा यांचे विचार प्रबोधात्मक तर आहेतच तसेच
तर्क शुध्दीच्या आधारावर त्यांनी वेळोवेळी सिद्धही करून
दाखवले कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर
यांच्याबरोबर त्यांचे नाव जोडले जाते. गाडगेबाबा यांचा
वैचारिक दृष्टीकोन , स्वच्छता, सामाजिक न्याय आणि
दिनदुखिताच्या सेवा यावर भर दिला भाऊराव पाटील यांच्या
कार्याला पाठिंबा दिला. गाडगेबाबा यांचे किर्तन अज्ञानी
अडाणी माणसाच्या मनाचा ठाव घेत असे त्यातील बोधात्मक प्रसंग विचार सारणीला पटेल असेच असत नवसा विषयी अंधश्रद्धे विषयी भोळ्या भाबड्या असणाऱ्या
लोकांच्या मनात “देवाधर्मा ” विषय असलेला अंधार त्यावर
नेहमी गाडगेबाबा यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला
त्यांचाच कवितेतून…..ते म्हणतात
किती पुजला देव तरी , देव अजून गावला नाही
कुठं राहतो कुणास ठावूक , अजून पर्यंत घावला नाही……
मंदिरासमोर लुटली इज्जत, हा बघत बसला पोरीला
रक्षण करतो म्हणाला अन् स्वतः च गेला चोरीला …..
हातात असून धारदार शस्त्र, कधी चोरामागे धावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक
अजून पर्यंत घावला नाही ……
म्हणजेच अशाही प्रकारे देवाचे खरं रूप दाखवून
देणारे गाडगेबाबा, तो देव आहे म्हणून आपण त्याच्यावर
आरोप घेतले तर देव आपल्याला माफ करणार नाही
किंवा शाॅप देईल म्हणून कधी देवाचा उदोउदो केला
नाही तर परखडपणे त्यांनी त्यांचे मत मोठमोठ्या
ज्ञानी विध्वाना समोरही मांडले . त्यांची विचार करण्याची
क्षमता व तर्कीक बुध्दी वाखाणण्या जोगी होती यात
तिळमात्र शंका नाही. पण त्यांच्या तत्वप्रणालीचा
समाजमनावर आजतरी फरक पडलेला दिसतो का…?
तर्कबुध्दीने नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वतः च्या
मनमस्तिष्कात शिरून किंवा स्वप्रग्लभतेचे विचार
जाणण्याचा प्रयत्न करतो का ….?
हेही तेवढेच महत्त्वाचे .
याचीही समिक्षा होणे आवश्यक, विषय हा भोळ्या
भाबड्या भक्तगणांचा नाही तर तर्कशुद्ध विज्ञानवंत
विज्ञानवादी, ज्ञानाच्या संगतीने चालणाऱ्या ज्ञानवंत
सुज्ञ सुशिक्षितांचा आहे. आपण पुस्तकी ज्ञान संपादन
करतो म्हणजे सर्वच ज्ञानात आपण पारंगत आहो
असे होत नाही, आपल्याला ज्ञान तरी किती असते
जेमतेम दहा विस पुस्तकाचे पण त्याही पलीकडे जाऊन
पाहीले तर खरी बुध्दीमता ही आपल्या तर्किक मार्मिक
इच्छा शक्तीवर आधारित असते . माणूस सत्य काय
व असत्य काय हे जाणण्याची कला शिकला व सत्याची
पारख करायला शिकला तर त्याला जात ,पात ,धर्म बोली भाषा याचा कुठलाही फरक पडत नाही त्याला हवं
असते फक्त सत्य ;त्याच सत्याच्या मार्गाने आपण जाण्याचा
प्रयत्न केला तर….. स्वताची विचार क्षमता पारखण्याची
व खोट्या भ्रमजाळात न फसता सत्याचा उलगडा होईल
गाडगेबाबा अडाणी होते पण त्यांची विचार क्षमता
बुद्धीवानांना आव्हान देणारी होती. गाडगेबाबा हे घर संसार
मुलंपत्नी आई सोडून सर्वस्वाचा त्याग स्विकारून तितिक्षा
गुण अंगिकारलेले कर्मयोगी होते . त्यांची दृढ वैचारिकता
व विचार करण्याची क्षमता मोठमोठ्या विध्वानाना आव्हान
देणारी होती. ते स्पष्टपणे म्हणतात हरी हरी करून प्रश्न
सुटत नाहीत, प्रश्न सुटतील ते शिक्षणातून,स्वच्छतेतून
गाडगेबाबा मुद्याचे बोलत त्यातून माणसाची मने दुखायची
पण बाबा एकाच गोष्टीवर अडून राहत. देव देवळात नाही
माणसात आहे. आणि उदाहरण देवून बऱ्याचदा समजावून
सांगायचे. हेच गाडगेबाबा यांच्या कीर्तन संभाषणातून वारंवार दिसून येते. गाडगेबाबा आजारी असताना बाबासाहेब
त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा गाडगेबाबा म्हणतात…..
” डॉक्टर तुम्ही कशाला आलात ” ? मी एक फकीर , तुमचा एक मिनिट महत्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार” आहे. त्यावर बाबासाहेब म्हणाले…. बाबा माझा अधिकार तो दोन दिवसाचा . उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी
विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.”
हा संवाद एकून बाबासाहेब यांच्या डोळ्यात पाणी आले .
कारण दोघानाही या शेवटच्या भेटीची जाणिव झाली असावी.
गाडगेबाबा यांचे जिवन म्हणजे समाज सुधारणा, साधेपणा ,
निस्वार्थ सेवा आणि मानवतेचा संदेश , ग्राम स्वच्छता अभियान गाडगे बाबा म्हणजे वैचारिक नीतीवंत तितिक्षा गुण अंगीकरून बनलेले कर्मयोगी, आज त्यांचा स्मृतीदिन
त्यानिमित्ताने शतशः प्रणाम
नंदा भगत कारंजा लाड
वाशिम















