
कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी नागपूर – पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हलसाठी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील कवयत्री लोपामुद्रा शहारे यांची निवड केली आहे कवि संमेलनासाठी यांच्या कवितेची सुध्दा निवड झाली आहे.संविधान दूत फुलेप्रेमी, आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हलचे अध्यक्ष विजय वाढवेराव यांनी निवड पत्र देऊन आमंत्रित केले आहे.सावित्री फुले विचारांचा जागर, संविधान जागृती करीता २ते५ जानेवारी असे सलग ४ दिवस हा कार्यक्रम एम.एस.जोशी फाउंडेशन सभागृह,पुणे येथे संपन्न होणार आहे. सावित्री-फुले काव्य संमेलनासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील कवि, कवयत्री आपल्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हल गाजवणार आहेत.















