
यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ पर्यंत एस.एम.जोशी सोशल फाउंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे चार दिवसीय दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.
या चार दिवसीय काव्य जागर सोहळ्यासाठी यवतमाळ स्थित कवयित्री व लेखिका संगीता राजेश नागदिवे यांच्या कवितेची निवड झाली आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने देशात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल ची सुरुवात झाली.
या जानेवारीत महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून त्या अंतर्गत कविता सादरीकरण करण्यासाठी कवयित्री लेखिका संगीता नागदिवे यवतमाळ यांना निमंत्रण मिळाले आहे .या फुले महोत्सवात उपस्थित राहून कविता सादर करण्यासाठी त्यांना आयोजक संविधान दूत विजय वडवेराव यांनी निवड पत्र प्रदान केले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे.















