prabodhini news logo
Home ठळक बातम्या महाराष्ट्रीयन पेहराव स्पर्धेत वंदना विनोद बरडे पुरस्क्रुत

महाराष्ट्रीयन पेहराव स्पर्धेत वंदना विनोद बरडे पुरस्क्रुत

0
106

कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी नागपूर – दिनांक २१डिसेंबर २०२५ ला रोकडे ज्वेलर्स लक्ष्मीनगर नागपूर येथे किटी सभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रथयत : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन वंदना विनोद बरडे अध्यक्ष व महीला मंडळ यांनी केले.आणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.किटी सभा व बीसि कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यात विविध गेम्स, घेण्यात आले.तसेच विशेष म्हणजे मुख्य आकर्षण व स्पर्धा ही महाराष्ट्रायीन पेहराव ही स्पर्धा घेण्यात आली.त्यात वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष या पहील्या क्रमांकाने विजयी झाल्या.व त्यांना रोकडे ज्वेलर्स लक्ष्मीनगर नागपूर यांच्या कळून चांदीची लक्ष्मी व गणपती एकत्रित मुर्ती असलेला फोटो देऊन सन्मानित करण्यात आले.तसचे या कार्यक्रमाला ५० स्त्रियांनी भाग घेतला होता.तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती रोकडे ज्वेलर्सचे ओनर यांना भेट करण्यात आली.ही मुर्ती यासाठी की हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्षे साजरे करणे होय.त्यानिमीत्य ती जनजागृती प्रचार व प्रसार व्हावा हा आहे.तसेच जास्त बोलकी व पुर्ण हौजी अंजली काटोके हिने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here