
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशन IRSF NEW DELHI व रोप स्कीप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित IRSF मान्यताप्राप्त राष्ट्रीय रोप स्कीप्पिंग चॅम्पियनशिप , अलिबाग, रायगड मधे चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशन ® व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर च्या एकुण 12 खेळाळु नि ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.
या स्पर्धा मधे संपूर्ण देशातील 19 राज्यातील जवळपास 750 रोप स्कीप्पिंग खेळाळु यांनी सहभाग नोंदविला.
सर्व यशस्वी विजेते यांना इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशन चे पेट्रोन (संरक्षक) व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन चे जनरल सेक्रेटरी आदरणीय संजय शेटे (अध्यक्ष – महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन, मुंबई) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
या भव्य राष्ट्रीय स्पर्धेत चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशन ®
1) दीक्षांत रामटेके ..01 सिल्व्हर मेडल अँड 01ब्राँझ मेडल
2) दीक्षांत सोनारकर .. 01 ब्राँझ मेडल
3) नैतिक झांबडे … सिल्व्हर मेडल
4) आर्यवीर राठोड .. सिल्व्हर मेडल
5) अमीन खान.. सिल्व्हर मेडल
6) ईशान शेख.. सिल्वर मेडल
7) संस्कार ठाकुरवार .. सिल्व्हर व ब्राँझ मेडल
8) कु खुशी वाघमारे .. गोल्ड मेडल
9) नयन वाडगुळे .. सिल्वर मेडल
10) रुद्रा हिंगणे .. सिल्वर मेडल
11 ) कु कुमुद नैताम .. सिल्व्हर मेडल
12) जीत चिन्ने .. सिल्वर व ब्राँझ मेडल
यांनी चंद्रपूर जिल्हा साठी आपल्या रोप स्कीप्पिंग या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
*सर्व विजेत्या खेळाडूंना रोप स्कीप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ® चे अध्यक्ष सुभाष चंद्र नायर,मुंबई, तांत्रिक सचिव मिलिंद पांचाल, मुंबई व इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशन चे राष्ट्रीय जज दुर्गराज एन रामटेके यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.
इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशन,(मान्यता.. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, युनिव्हर्सिटी गेम्स, केंद्रीय विद्यालय संघटन,CBSE बोर्ड, नवीदय विद्यालय, क्रीडा भारती और खेलो इंडिया क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त प्राचीन भारतीय पारंपारिक कला खेल ) या क्रीडा प्रकारात चंद्रपुर जिल्हा असोसिएशन ला राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच मिळालेल्या या ऐतिहासिक यशासाठी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशन ® च्या संस्थापक व अध्यक्षा सौ शीतल रामटेके, सचिव करण डोंगरे, सहसचिव बी एल करमनकर, आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर चे संजय माटे, सुरज मेश्राम, तांत्रिक अधिकारी अशोक कामडे व कोचेस गणेश राठोड, राकेश राय, संदीप पंधरे, पांडुरंग भोयर, असोसिएशन चे पदाधिकारी सिनु रामटेके, कपिल रामटेके, आकाश वाघमारे, यश सोरते इत्यादी रोप स्कीप्पिंग क्रीडा प्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.















