prabodhini news logo
Home चंद्रपूर “दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल-2026 पुणे” च्या अध्यक्ष करिता आद. गायत्री अनिल कुमार...

“दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल-2026 पुणे” च्या अध्यक्ष करिता आद. गायत्री अनिल कुमार रामटेके यांची निवड

0
172

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पुणे येथे होणाऱ्या “दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल-2026” मध्ये “मीं सावित्री बोलतंय” एकपात्री अभिनय सादर करण्याकरिता तसेच या सत्राचे अध्यक्ष करिता बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथील आद गायत्री अनिल कुमार रामटेके यांची निवड करण्यात आलेली आहे.
आद गायत्री अनिल कुमार रामटेके यांनी मी जिजाऊ बोलतेय,मीं सावित्री बोलतेय, मी रमाई बोलतेय या एकपात्री प्रयोगाचे 168 प्रयोग संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगना आणि आंध्रप्रदेश मंधे केलेले आहेत.त्याच प्रमाणे त्यांचे सामाजिक कार्यात खूप मोलाचे योगदान आहें. त्यांच्या कार्याची दखल घेऊन दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल-2026 चे आयोजक,फुले प्रेमी, संविधान दूत आद विजय वडवेराव यांनी निवड केलेली आहें. या बाबत चे
अधिकृत निवडपत्र,आमंत्रण दिले आहे . दि 2 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत पुण्यातील एम एस जोशी फाउंडेशन सभागृहात सलग चार दिवस होणारा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल,सावित्री फुले विचारांचा जागर करणारा ठरणार आहे. सावित्री- फुले काव्य संमेलनात महाराष्ट्रसह राज्याबाहेरील कवी,गायक, संगीतकार ,कवयित्री गझलकार ,पोवाडे ,नृत्य सहभागी होणार असून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार प्रसार व्हावा,देशातील पहिली मुलींच्या शाळेचा, भिडे वाड्याचा इतिहास जतन व्हावा तसेच भारतीय संविधाना विषयी समाजातल्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती व्हावी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागतिक स्तरावर जागर केला जाणार आहे.
आद गायत्री ताई रामटेके यांची “दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे-2026” मध्ये अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी भरभरून अभिनंदन कौतुक केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here