prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली नगरपरिषद निवडणूक : भाजपाच्या नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा दणदणीत...

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक : भाजपाच्या नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निंबोरकर यांचा दणदणीत विजय

0
131

मा.खा. डॉ. अशोक नेते यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन…..

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. २३ डिसेंबर २०२५ गडचिरोली नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन केले असून, भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी अँड. प्रणोती सागर निंबोरकर यांची दणदणीत निवड झाली आहे. त्यांच्या या विजयाबद्दल माजी खासदार तथा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.

यावेळी मा.खा. डॉ. अशोक नेते यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचेही अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गडचिरोलीच्या विकासासाठी नगरपरिषदेतून लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान कामकाज होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भावना व्यक्त करताना नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निंबोरकर म्हणाल्या की,
“या यशामागे मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे सक्षम नेतृत्व, मार्गदर्शन आणि भक्कम संघटनात्मक कार्य मोलाचे ठरले आहे. पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच गडचिरोलीतील जनतेच्या विश्वासामुळेच हे यश शक्य झाले.”
यावेळी त्यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि मतदारांचे मनापासून आभार मानले.
या विजयामुळे गडचिरोली नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात भाजपाच्या वाढत्या प्रभावाचे हे महत्त्वपूर्ण व यशस्वी उदाहरण ठरत आहे.

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, सागर निंबोरकर, सामाजिक नेते मनिष समर्थ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here