prabodhini news logo
Home ठळक बातम्या संविधान रक्षणासाठी मुंबई महापालिकेत दोन ‘नैसर्गिक’ मित्रांची आघाडी!

संविधान रक्षणासाठी मुंबई महापालिकेत दोन ‘नैसर्गिक’ मित्रांची आघाडी!

0
103

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित आघाडीची आज घोषणा करण्यात आली. मुंबईतील लढाई ही मुंबईकरांच्या हक्कासाठी आहे. गेले साडे तीन वर्ष मुंबईत निवडणुका न घेता प्रशासनाच्या माध्यमातून महायुतीने राज्य केले. मुंबईकरांचा पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला. मूळ मुंबईकरांना मुंबईतून हद्दपार करत उद्योगपतींना पायघड्या घालणाऱ्या हुकूमशाही विरोधातील आमची ही लढाई आहे. या लढाईत आज आम्हाला बळ लाभले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक बाळासाहेब आंबेडकर यांची!

मुंबई महापालिकेत सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार कायम राहावेत, त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी काँग्रेस आणि वंचितने आघाडी केली आहे. लोकशाही अबाधित ठेवण्याच्या या लढाईत आमचे नैसर्गिक मित्र म्हणून वंचितने आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला,याचे आम्ही मनापासून स्वागत करतो!

संविधानाला अभिप्रेत महाराष्ट्र आणि मुंबई घडवणे, हाच आमचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. ही आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा देईल.आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अधिकृतपणे मित्रपक्ष म्हणून मैदानात उतरत आहेत!
भाजपच्या दडपशाहीविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ही अभेद्य वज्रमूठ आता सज्ज आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here