prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप

प्रबोधिनी मंच महराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप

0
106

चालू वर्ष संपताना,
नव्या वर्षाची चाहूल
स्मरतांना आठवणी
पुढे जाते पाऊल.. १

कडूगोड अनुभव,
सुख दु:ख भागतांना
मिळवतो गमावतो
आयुष्याला जगतांना.. २

नव वर्षाचे संकल्प,
पूर्ण कधी ते अपूर्ण
नशिबाच्या संगतीने
जगणेच अर्थपूर्ण… ३

जाते आयुष्य वाहत,
उगा बेचैन का व्हावे
ओंजळीत मावणारे
तेच घेऊनी चालावे.. ४

नव्या येणा-या वर्षात,
घडो सत्कर्म सत्कार्य
द्यावे मजला देवाने
क्षमा करण्या औदार्य.. ५

सौ. रेखा मालपुरे कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here