
सोलापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे खंबीर पदाधिकारी ॲड. राकेश उर्फ बंटी घाडगे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ॲड. राकेश घाडगे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या पक्षप्रवेशावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. घाडगे यांच्या प्रवेशामुळे सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बाजू अधिक भक्कम झाली आहे.















