prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फ विशेष कविता – सरत्या वर्षांला निरोप

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फ विशेष कविता – सरत्या वर्षांला निरोप

0
102

आज सरत्या वर्षाला
निरोप देऊया छान
खुप त्रास दिला त्याने
जगु आनंदाचा क्षण…१

आता येणारच नाही
कोणतीहि महामारी
हिच ईश्वरचरणी
करुया प्रार्थना तरी…..२

दुःखी गेलेले दिवस
पुनः न कधीच यावे
सुखाचे सोनेरी क्षण
सगळ्यांनाच मिळावे…३

प्रेम आपुलकी नाते
पुन्हा छान बहरावे
सर्वांना नविन वर्ष
सुखरुप क्षण जावे…४

आनंदीत सगळ्यांनी
रहा हिच मनी ईच्छा
दिन नुतन वर्षाच्या
भरभरून शुभेच्छा….५

नव्या वर्षाचे स्वागत
करु नव्या उत्साहात
गोड या आठवणींना
जपुया गोड हृदयात…६

सौ. अपर्णा नंदकिशोर येवलकर
सटाणा, नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here