
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – यवतमाळ : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा यवतमाळच्या वतीने मागील 16 वर्षापासून बांधकाम सुरू असलेले “बोधिसत्व महाविहार” चे डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांच्या हस्ते दिनांक 28 डिसेंबर 2025 ला उद्घाटन करून सर्व जनते करिता लोकार्पण केले.
भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ जिल्हा चे मागील 20 वर्षांपासून, जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत असलेले आद रवी भगत आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी खूप अथक परिश्रम घेऊन, नियोजन बद्ध प्लॅनींग करून, संपूर्ण कार्यात पारदर्शक ता ठेऊन,कोणत्याही राजकीय व्यक्तीचा एक रुपयाही न घेता समाजाच्या लोकवर्गणीतून या महाविहाराची निर्मिती केली. ही फक्त वास्तु नसून भारतीय बौद्ध महासभेचे, बौद्ध धम्माचे संस्कार केंद्र आहें, यामध्ये वरच्या मजल्यावर अतिशय महत्त्वाचे “सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र” निर्माण केले आहे.
राजगृहाचा आदेश सरआखोपे” भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी आदेश दिले होते की प्रत्येक जिल्ह्यातभारतीय बौद्ध महासभा चे असे मोठे महाविहार निर्माण झाले पाहिजेत त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही निवडक जिल्हा मध्ये असे महाविहार निर्माण झालेले आहेत त्या पैकी यवतमाळ जिल्हा आहें. सन 2010 ला महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी या महाविहारचे भूमिपूजन केले होते आणि आज भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते या विहाराचे लोकार्पण झाले.आज खरंच या कार्याचा आदर्श घेण्याजोगा आहे.आद रवी भगत साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचे ला मानाचा मुजरा…
या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक कार्यक्रमा करिता भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यकारिणी चे आद प्रवीण निखाडे साहेब ट्रस्टी, आंतरराष्ट्रीय विभाग, आद एस के भंडारे साहेब स्टाफ ऑफिसर, आद जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष, आद वसंत पराड साहेब राष्ट्रीय सचिव, आद यु जी बोराडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य असेच भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ जिल्ह्या पूर्व आणि पश्चिम चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या सोहळाला महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून सुद्धा खूप मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांची उपस्थिती होती.















