prabodhini news logo
Home चंद्रपूर वरोरा शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ!

वरोरा शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ!

0
104

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – ​वरोरा नगर परिषद निवडणुकीत माय-बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर, आज नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या पदग्रहण सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लावली.

​जनतेने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्या निश्चितच कटिबद्ध राहतील, असा मला ठाम विश्वास आहे. अर्चना ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा!

यावेळी अहतेशाम अली (जिल्हाउपाध्यक्ष), विलास नेरकर (जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), मिलिंद भोयर (तालुका अध्यक्ष वरोरा), प्रशांत काळे ( तालुका अध्यक्ष भद्रावती), विलास टिपले ( शहर अध्यक्ष),यशोदा खामणकर (शहर अध्यक्ष), आशिष ठाकरे आणि प्रदीप बुरान त्याचबरोबर वरोरा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक गजानन मेश्राम ( गटनेता), बंडू देऊळकर, राहुल देवळे, मनीष जेठानी, अनिल झोटिंग, खेमराज कुरेकार, सुष्मा चांभारे, रोशनी भडके, मंगला पिंपळकर, कुणाल रुयारकर, अभय ठावरी, गजानन जिवतोडे, योगिता नेरकर, तेलतुमडे आणि राजकुमार खंडारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नव्या जबाबदारीचा श्रीगणेशा, वरोऱ्यात विकासाच्या पर्वाची सुरुवात..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here