prabodhini news logo
Home चंद्रपूर परिवर्तनाची ताकद जनशक्तीत; चिमूर–भिशी नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात

परिवर्तनाची ताकद जनशक्तीत; चिमूर–भिशी नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात

0
106

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चिमूर येथील शहीद बालाजी रायपुरकर सभागृहात चिमूर नगरपरिषद व भिशी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नवनियुक्त नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा काल मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

यावेळी बोलताना सांगितले की, चिमूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपण कमी पडलो नाही, तर केवळ प्रचारासाठी एक दिवस कमी पडला. अन्यथा एकहाती सत्ता स्थापन करून चिमूर नगरपरिषदेत परिवर्तन घडवत काँग्रेसचा झेंडा अभिमानाने फडकवला असता. आज जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आगामी काळात नगरपरिषदेत घेतल्या जाणाऱ्या जनविरोधी निर्णयांना ठामपणे विरोध करून जनशक्ती आपल्या बाजूने उभी करणे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे, हे त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे. या परिषदेत पराभवाचे चित्र विजयात बदलायचे असेल, तर सर्व नगरसेवक–नगरसेविकांना खंबीर आणि एकसंध भूमिका घ्यावी लागेल.

आज देशातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे काम सत्ताधारी सरकार करत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. समाजात दरी निर्माण करून सत्तेची पोळी भाजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद जनशक्तीत आहे. आज गावागावातून आणि शहराशहरातून जनशक्ती परिवर्तन घडवत असून, हीच ताकद येत्या काळात निर्णायक ठरणार आहे.

यावेळी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय गावंडे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जुनेद भाई खान, जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके, राजू चौधरी, विवेक कापसे, राजभाऊ लोणारे, प्रदीप तळवेकर, संजय घुटके, स्वप्निल मालके, रहमान पठाण, शांताराम शेलवटकर, सुभाष बनसोड, बालाजी कोयचाडे, विनोद ढाकुनकर, सचिन गाडीवार, मनीष नंदेश्वर, इरफान पठाण, अमोल जुनघरे, रवी सावसाकडे, राजू दांडेकर, सतीश वनकर, रवी चौधरी, संतोष गोठणे, रत्नाकर विठाडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here