
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनात, मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होऊ असलेल्या ऐतिहासिक सातारा नगरीतील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्या करीता कारंजा लाड येथील सुप्रसिद्ध साहित्यीका ॲड. मंगला नागरे यांच्या कवितेची निवड करण्यात आलेली असून, साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोदजी कुळकर्णी, कविकट्टा प्रमुख राजन लाखे तथा समन्वयक सविता कारंजकर यांचेकडून ॲड. मंगला नागरे यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलविण्यात आलेले असून त्यांचे काव्यवाचन उद्या दि ०३ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या काव्य कट्टयात होणार आहे.त्यांच्या या यशामुळे कारंजा येथील साहित्यक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेल्याचे मत स्थानिक ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले असून नागरे मॅडम यांचेवर सर्व क्षेत्रातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .















