
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशीम : वाशीम जिल्ह्यातील, विनम्र अशा सेवाभावी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले युवा पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेशजी सोमाणी यांनी नूतन वर्षाच्या प्रारंभीच आपल्या वाशीम नगरीत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने जबाबदारी स्विकारून,वाशीम येथे लवकरच होऊ घातलेले “पत्रकार आधिवेशन तथा श्री गुरुदेव कार्यकर्ता.” संमेलनाचे ‘न भुतो न भाविष्यती’ अशा प्रकारचे यशस्वी आयोजन करण्याचे दृष्टीने तन-मन-धनाने प्रयत्न सुरू करून,दि.०१ जानेवारी २०२६ रोजी उपराजधानी गाठली.आणि देशातील विकासाचे महामेरु, भाजपा पक्षाचे पहिल्या फळीतील कतृत्ववान नेतृत्व तथा केन्द्रिय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून,सेवा सदन शिक्षण संस्था नागपूरच्या शतक संवत्सरी महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाला लाभलेल्या, श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याच्या आध्यात्मिक धर्मगुरु आणि कोषाध्यक्ष असलेल्या परमपूज्य संत गोंविदगीरी महाराजांची सदिच्छा भेट घेऊन,त्यांना पत्रकार अधिवेशन आणि गुरुदेव कार्यकर्ता संमेलनाची सविस्तर माहिती देवून, “महाराष्ट्रातील पत्रकारांकरीता त्यांचे कडून आशिर्वाद मिळवीले.नागपूर येथील सेवासदन शिक्षण संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा ह्या गडकरीजींच्या सौभाग्यवती आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला केन्द्रिय मंत्री नितीनजी गडकरी सहपरिवार उपस्थित होते.या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील ग्राम कुऱ्हा येथील वारकरी संस्थेला पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या संस्थेचे अध्यक्ष सुधीर भारतीय यांचा निलेश सोमाणी यांनी देखील सत्कार केला.त्यामुळे वाशीम येथील “पत्रकार आधिवेशन व गुरुदेव कार्यकर्ता संमेलनात” साहित्यीक,वैचारिक, आध्यात्मिक, सामाजिक विचारांचा सुगम संगम,पत्रकार निलेश सोमाणी यांचे कडून साधल्या जाणार असल्याचे स्पष्ट होत असून पत्रकारांच्या विविध अडीअडचणी व समस्या शासनाकडून दूर होणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.















