prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

0
133

३ जानेवारी १८३१रोजी
नायगावी खंडोजी व लक्ष्मीच्या
पोटी जन्म घेतला सावित्रीने!! १!!

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी
खंडोजी ने लग्न लावून दिले
महात्मा फुले शी तेव्हा सर्वस्वी
मानियले फुलेना सावित्रीने!! २!!

ओळखुन महत्त्व शिक्षणाचे
महात्मा फुलेंच्या मदतीने
संपूर्ण शिक्षण घेतले सावित्रीने!! ३!!

१८४८ साली सूरु केली मुलींची
पहिली शाळा अन १८५२ प्रयंत १८ शाळा सुरु करून
ज्ञान देण्याचें कार्य सुरू केले सावित्रीने!! ४!!

शिक्षण रुपी प्रवास सोपा
नव्हताच तिला सेण, दगड, शिविगाळ,
मार खावुनही ज्ञानरूपी जागरूकतेचा दिवा
अविरत चालू ठेवला सावित्रीने!! ५!!

समाजातील रूढी, प्रथा, पंरपरा,
बालहत्या, विधवा पुनर्विवाह, सतीप्रथा,
स्वातंत्र्य,समता, बंधुतेसाठी
न खचता न डगमगता ज्योतिबाच्या
मदतीने शेवटपर्यंत लढा दिला सावित्रीने !! ६!!

जगभर ख्याती पसरली शिक्षणा द्वारे
चुल व मुल एवढेच विश्व असणाऱ्या
मुलींना प्रत्येक क्षेत्रात ऊंच
उडण्याचे बळ दिले सावित्रीने !! ७!!

झाल्यात महिला डॉ, इंजिनिअर, वकील, राष्ट्रपती,
आज एवढे कर्तुत्व निर्माण करुन ठेवले
ते शिक्षणाची जननी,
शिक्षणाची देवी मानल्या
जाणारी माऊली सावित्रीने !! ८!!

नवीन आशा,नवीन स्वप्न,
नवे बळ दिले, कोंडलेल्या स्त्रियांना जणू
अंधारातून प्रकाशाकडे नेले
केला संपूर्ण स्त्रियांचा उद्धार
सावित्रीने,सावित्रीने!! ९!!

कुमुद फुलझेले
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here