prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

श्री. नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

0
116

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिनाचे श्री. नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. रामदास सानप,उपमुख्याध्यापिका मा .श्रीम सविता नाणेकर, पर्यवेक्षिका मा. विद्या ठोंबरे, मा. शामला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कु पूर्वजा तलवारे सहावी ड व कु अनुराधा मोघे पाचवी ड यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा केली होती .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुषमा शेवाळे ह्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी ह कुमारी शिवानी तेलप व कुमारी कल्याणी पाटील यांनी केले. मा. दिनेश बोरचटे सर, मा मनिषा सांडभोर यांनी मनोगत व्यक्त केले. मा . ज्योती घरबुडे, मा. कविता बुरुड, मा . वृंदा क्षीरसागर, मा. मनिषा सांडभोर, मा मा . विश्वकर्मा चव्हाण, मा.पवन खराडे, मा. दिपाली काळे, मा. स्वीकार लोंढे, मा दत्ता बुर्डे मामा, मा. रमेश कसबे या सर्वांनी कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी योग्य नियोजन केले. इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली ‘
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुषमा शेवाळे यांनी श्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले कविता बुरुड यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here