
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत तसेच SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अभियानाअंतर्गत शाळा क्रमांक ०४ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापालिकेचे मा. आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.
सन २०२५–२६ च्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि मतदानाचा अधिकार याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेली पोस्टर्स, घोषवाक्ये व निबंधांचे सादरीकरण करण्यात आले.
मा. आयुक्तांनी उपस्थितांना संबोधित करताना “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क व कर्तव्य असून सर्वांनी निर्भय व उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे,” असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मतदानाचा संकल्प घेतला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, SVEEP समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरा–भाईंदर महानगरपालिका प्रशासनामार्फत अशा जनजागृती कार्यक्रमांद्वारे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
8104170564
mojissports@gmail.com















