prabodhini news logo
Home ठळक बातम्या देवाच्या नावाने वोट मागणाऱ्या या राजकीय भिकाऱ्यांपेक्षा पोटासाठी रस्त्यावर भीक मागणारा अधिक...

देवाच्या नावाने वोट मागणाऱ्या या राजकीय भिकाऱ्यांपेक्षा पोटासाठी रस्त्यावर भीक मागणारा अधिक इमानदार…

0
102

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मधील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत धवड, सीमा ढोक, कुसुम बावनकर, सहदेव गोसावी यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी देवाच्या नावावर मतं मागतो. २०१४ पासून सत्तेत असूनही हे लोक कामाच्या भरोशावर नाहीत, तर रामाच्या भरोशावर राजकारण करत आहेत. विकास, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महागाई या प्रश्नांवर बोलण्याची यांची हिंमत नाही.

राजकारणात विकासाच्या मुद्द्यांवर, जनतेच्या मूलभूत गरजा आणि समस्यांवर चर्चा झाली पाहिजे. संविधानाने दिलेल्या अधिकारांवर बोलले पाहिजे. मात्र भाजपकडून असा बरळणारा आवाज ऐकू येतो की “जो श्रीराम म्हणेल तो महापौर होईल.” पण यांना कोणीतरी सांगितले पाहिजे की ज्याला जनता निवडून देईल तोच या खुर्चीवर बसेल, मग तो छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा असो, बाबा ताजुद्दिन यांना मानणारा असो किंवा संविधानावर निष्ठा ठेवणारा असो.

आजचा भाजप म्हणजे खाणाऱ्यांना आणि बलात्कार्‍यांना संरक्षण देणारा पक्ष झाला आहे. प्रचंड भ्रष्टाचार करून इमानदारीच्या गप्पा मारायच्या, महाराष्ट्र लुटायचा आणि चोर-लुटारूंना पक्षात घेऊन त्यांना तिकीट द्यायचे, हीच यांची नीती झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. पण महागाई वाढवून त्याच बहिणीकडून दर महिन्याला ५ हजार रुपये वसूल कोण करत आहे. १५०० रुपये देऊन आमच्या बहिणींवर उपकार करत आहात का? हा पैसा तुमचा नाही, पक्षाचा नाही, हा पैसा जनतेचा आहे. या पैशातून आमच्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला तर त्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.

हे लोक सतत विचारतात ७० वर्षांत काय केलं? त्यांना सांगितले पाहिजे की आज जे देशाचे पंतप्रधान ज्या शाळेत शिकले, ती शाळासुद्धा काँग्रेसनेच सुरू केली होती. ज्या संविधानाच्या आधारावर तुम्ही आज सत्तेच्या खुर्चीवर बसले आहात, त्या संविधानाची पुण्याई डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आणि काँग्रेसची आहे.

आज २०–२५ टक्के कमिशनशाहीमुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारी रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे, शिक्षण व्यवस्थेची वाताहत झाली आहे. हे लोक म्हणतात आम्ही कोट्यवधी रुपये आणले, पण त्याच कोट्यवधी रुपयांचे कमिशनही यांनी खाल्ले आहे. फुकट काहीही आणलेले नाही; जे आणले त्यातून जनतेची लूट केली आहे.

आज देशात जनतेच्या हक्कांसाठी, संविधानाच्या रक्षणासाठी राहुल गांधी लढत आहेत. ही लढाई नसती तर आज आपल्याला गुलाम म्हणून जगावे लागले असते. म्हणूनच आपल्या हक्कांसाठी, आपल्या अधिकारांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीपासून सुरुवात करा. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here