
कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी नागपूर – प्रभाग १८ मधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रकाश बांते, शारदा लुटे, कृतल आकरे, नयन तरवटकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केले. काँग्रेसच्या विचारांचा पाईक हाच खरा राष्ट्रभक्त आहे, आज सत्तेत बसलेले लोक स्वतःला विकासाचे कैवारी म्हणवतात, पण प्रत्यक्षात हे धर्माच्या नावाखाली लोकांच्या मनात विष पेरतात. रस्त्यावरचा भिकारी पोटासाठी भीक मागतो, पण भाजपचे नेते देवाच्या आणि रामाच्या नावाने मते मागण्यासाठी गल्लोगल्ली भिकारी उभे करत आहेत.
राज्यात महायुती सरकार म्हणजे लुटारूंची टोळी सत्तेत बसली आहे, यांना गरीब, ओबीसी, दलित, शोषित किंवा बारा बलुतेदारांशी काहीही देणेघेणे नाही. जेवढे मिळेल तेवढे खा हेच यांचे एकच लक्ष्य आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री केवळ स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करत राज्याची तिजोरी लुटत आहेत. निवडणुका आल्या की वेगळे लढतात. भाजप आणि शिंदे एकत्र अजित पवार स्वतंत्र निवडणुका लढतात कारण अजित पवारांना केवळ काँग्रेसची मते खाण्यासाठी बाजूला ठेवले आहे. जे जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत जाऊन बसतात, ते सेक्युलर कसे असू शकतात का, लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेने या भूलथापांना बळी पडू नये. ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी केलेली रणनीती असून निवडणुकीनंतर हे तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त टक्केवारी खाल्ली गेली आहे. नागपूरच्या स्वच्छतेचा हा हाल आहे की, इथे ‘सुदृढ मच्छर’ स्पर्धा भरवता येईल. नागपूरची मुले आजही नोकरीसाठी मुंबई-पुणे का जातात याचा विचार केला पाहिजे, बदलापूर प्रकरणात लैंगिक शोषण करणाऱ्या सहआरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले, यावरून यांची नीती स्पष्ट होते. राज्यात दररोज सहा महिलांवर बलात्कार होत आहेत, दीड लाख मुली बेपत्ता आहेत, हे देवेंद्रजींच्या गृहखात्याचे अपयश आहे, आणि हे फक्त विकासाच्या थापा मारतात.
येत्या १५ जानेवारी रोजी नागपुरात परिवर्तनाची हाक द्या, महाराष्ट्र आणि देश वाचवायचा असेल तर ही विषवल्ली कापली पाहिजे आणि याची सुरुवात नागपूर महापालिकेतून केली पाहिजे. आज नागपुरात बदल झाला तरच २०२९ मध्ये देशात आणि राज्यात मोठे परिवर्तन दिसेल.















